Teachers summar vacation राज्यातील विद्यार्थी शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या परंतु शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार नाहीत शिक्षकांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्याबाबत एक मोठा निर्णय झालेला याचेच माहिती आपण आज पाहणार आहोत
Teachers summar vacation पूर्ण माहिती
राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे उन्हाळा चालू आहे दहावीच्या परीक्षा संपल्यात पहिली ते नववीच्या परीक्षा संपलेल्या निकाल देखील जारी झालेला आहे सुट्ट्या देखील मुलांना लागलेल्या आहेत परंतु आता शिक्षकांना सुट्ट्या कधी लागणार या मोठा प्रश्न आहे यामध्ये स्वतः उन्हाळ्यात सुट्ट्या रद्द झाल्यामुळे शिक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे उन्हाळ्यात सुट्ट्या आरोग्य झाल्याने आता शिक्षकांनी विद्यार्थी पालक त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांच्या देखील सुट्ट्या रद्द झाल्याने संताप व्यक्त होत आहे तर बघूयात संपूर्ण माहिती
Teachers summar vacation राज्यातील सर्व शाळांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाइन कामकाज, आधार व अपार आयडी अद्ययावत करणे, स्कूल मॅपिंग आणि संचमान्यता दुरुस्ती यांसारखी महत्त्वाची कामे उन्हाळी सुटीतच पार पाडावी लागणार आहेत.यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुटीला मुकावे लागणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. यानुसार, उन्हाळी सुटीत सर्व संबंधित शालेय कर्मचारी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत रितीने पार पाडण्यासाठी कार्यरत राहतील.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी व अद्ययावत नोंदणी करणे, अपार आयडी (स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक) अद्ययावत करणे, स्कूल मॅपिंग म्हणजेच शाळेच्या भौगोलिक माहितीचे अद्ययावतीकरण आणि संचमान्यतेशी संबंधित दुरुस्तीची कामेही पूर्ण करावी लागणार आहेत.
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले असून, त्यानुसार वेळेत नोंदणी, दस्तऐवज पडताळणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन प्रणालीतून कामकाज करताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित विभागीय कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सुट्यांचे नियोजन फिसकटले
दरवर्षी उन्हाळी सुटीत मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी गावाकडे, तसेच पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, यंदा सुरवातीला अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसोबत विविध शालेय कामांची गर्दी असल्याने यावर्षी सुटीच्या काळातच कामे पार पाडावी लागणार आहेत. त्यामुळे अनेकांनी सुट्यांमध्ये फिरण्याचे केलेले नियोजन बिघडले आहे. दीर्घकाळ सलग कामानंतर उन्हाळी विश्रांतीची गरज असताना प्रशासनाने कामाचे ओझे वाढवल्याने संबंधितांत नाराजीचा सूर उमटत आहे.
सुटीत करावयाची कामे
अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन नोंदणी, पडताळणी
विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पडताळणी, अद्ययावत करणे
अपार (स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक) माहिती सुधारित करणे
शाळेचे स्कूल मॅपिंग आणि भूगोलविषयक माहिती अद्ययावत करणे
संचमान्यता दुरुस्तीची कामे पूर्ण करणे
विविध शैक्षणिक व प्रशासकीय अहवालांची पूर्तता व अपलोडिंग