ST BUS FARE राज्यातील एसटी धारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे एसटीच्या दरात अचानक वाढ झालेले आहेत किती वाढ झालेली आहे आणि एस टी महामंडळाने कोणता निर्णय घेतलेला आहे याचा परिणाम काय होणारे प्रवाशांवर याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
ST BUS FARE संपूर्ण माहिती
राज्यातील एसटी धारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राची ओळख असलेली लाल परी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी लाल परी आता प्रवाशांना मोठा धक्का भेटत आहे कारण एसटी प्रवचच्या तिकिटामध्ये अचानक मोठी वाढ होत आहे अशा प्रकारचा निर्णय आता राज्य सरकार देणार आहे आणि तो प्रस्ताव देखील नेमकं काय म्हणाले आहे त्या प्रस्तावात आणि किती तिकीटा दरात वाढ होणार आहेत कशामुळे वाढ होणार आहे बघुयात पूर्ण माहिती
ST BUS FARE महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाकडून एसटीच्या तिकिटाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाकडून आता साफसफाई अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे. एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने सादर केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
एसटी प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही महिन्यात घट झाली आहे. त्यामुळे प्रवासी उत्पन्नावरही परिणाम होऊ लागला आहे. एसटी महामंडळाने २५ जानेवारीपासून सर्व प्रकारच्या सेवांमध्ये १४.९५ टक्क्यांची भाडेवाढ लागू केली. जनतेच्या तीव्र नाराजीनंतरही भाडेवाढ मागे घेण्यात आली नाही. अशातच आता एसटीच्या तिकिटांवर एक रुपयांचा भुर्दंड लादला जाणार असल्याची शक्यता आहे.
एसटी बस तिकिटांवर स्वच्छता कर लावण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने सादर केला आहे. सूत्रांनी माहिती दिली की, हा प्रस्ताव महामंडळाचे नवे अध्यक्ष परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर एसटी महामंडळाचा प्रवास महाग होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नागरीक आणि महिलांना तिकिट दरात सवलत असली तरी राज्य सरकारकडून या सवलत शुल्काची प्रतिपूर्ती महामंडळाला करण्यात येते. त्यामुळे तिकीट दरवाढीचा परिणाम सरकारी तिजोरीवर होणार आहे.