School college holiday शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना शिक्षकांना सुट्ट्या एवढ्या मिळणार
School college holiday राज्यातील शाळा कॉलेज शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे की त्यांना आता उन्हाळ्याच्या किती दिवस मिळणार आहेत कुणाला मिळणारे कोणत्या तारखेपासून मिळणारे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत
School college holiday संपूर्ण माहिती
राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत पहिली ते नववीच्या परीक्षा संपलेल्या आहेत निकाल देखील जाहीर झालेले आहेत त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे वर्षाच्या शैक्षणिक सुट्ट्या किती असणार आहेत या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज बघणार आहोत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना गावीला जात आहेत शिक्षकांना देखील आता निकालाचे काम जोरावर सुरू आहे दहावी बारावी परीक्षा देखील पहिले संपलेले आहेत नवीन वर्ष सुरू होण्याआधी आता महाराष्ट्रात शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे नवीन शैक्षणिक वर्षानुसार एवढ्या सुट्ट्या राहणार आहे बघूया संपूर्ण माहिती
School college holiday चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिल रोजी संपली असून २६ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. तरीपण, शिक्षकांना ४ मेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे. रमजान ईदची सुटी कामाच्या दिवशी (वर्किंग डे) घेतल्याने शिक्षकांची उन्हाळा सुटी एक दिवस लांबली आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्षातील २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान ८०० तास तर इयत्ता सहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे एक हजार तास अध्यापन बंधनकारक आहे. त्यानुसार अध्यापनाच्या तासांचे नियोजन अपेक्षित असते. या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालू राहिली. आता १ मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल (प्रगतीपत्रक) जाहीर होईल, त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. निकालानंतरही शिक्षकांना पुढचे चार दिवस शाळेत यावे लागणार आहे. दरम्यान, पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
दरवर्षी शिक्षकांना १२८ दिवस सुट्या
दरवर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षकांना तथा शाळांना १२८ दिवस सुट्या असतात. ७६ सार्वजनिक सुट्या असतात आणि त्यात उन्हाळा, दिवाळी सुट्या असतात. याशिवाय वर्षात ५२ रविवार देखील येतात. वर्षातील ३६५ दिवसांतून २३७ दिवस उरतात, पण त्यात अध्यापनाचे तास ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत असा नियम आहे.
५ मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी
विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून शिक्षकांना ५ मेपासून उन्हाळा सुट्या असतील. पुढे १५ जूनला रविवार असल्याने १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. दरम्यानच्या काळात शिक्षकांनी तथा प्रत्येक शाळेने चालू पटसंख्येत किमान १० टक्के वाढ होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना केल्या आहेत.