PM E-Drive Yojanas इलेक्ट्रिकल बाईक घेण्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देणार


PM E-Drive Yojanas राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही इलेक्ट्रिकल बाईक घेत असाल तर सरकार तुम्हाला पैसे देणार आहे नेमके कसे पैसे मिळणार कोणाला मिळणार आहे काय करावे लागेल यासाठी अर्ज कुठे करावे लागेल कागदपत्रे लागतील संपूर्ण माहिती

PM E-Drive Yojanas संपूर्ण माहिती

आजच्या युगामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी आता सरकार केंद्र सरकार वेगवेगळ्या उपयोजना करत आहेत तसेच इलेक्ट्रिकल वाहन देखील आणत आहे तुम्ही जर पाहिलं तर इलेक्ट्रिकल गाड्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार वेळोवेळी प्रयत्न करत आहे करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या देशातील पेट्रोल डिझेल ने होणारे प्रदूषण हे कमी करता येईल आणि नागरिकांना व्यवस्थित सोयी सुविधा पुरवता येतील यामुळे इलेक्ट्रिकल बाईक जर तुम्ही घेत असाल तर सरकारकडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत हो तुम्ही हे खरे ऐकता येत नेमक्या आता याच्यासाठी काय प्रोसेस आहे पात्रता काय असतील कागदपत्र काय असतील आणि आपल्याला किती पैसे मिळणार आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत कोणत्या योजनेद्वारे हे पैसे मिळणार आहेत बघूया संपूर्ण माहिती

PM E-Drive Yojanasइलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने पीए ई-ड्राइव्ह योजना सुरू केली. या अंतर्गत दुचाकी वाहन खरेदी करताना ग्राहकांना सरकारकडून अनुदान मिळते. देशातील विद्युत गतिशीलतेला प्रोत्साहन देणे, प्रदूषण कमी करणे आणि ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून तुम्हालाही रस्त्यांवर इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या वाढलेली दिसत असेल. आता सरकारने अलीकडेच या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदान प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ईव्ही अनुदान मिळण्यासाठी ४० दिवसांचा कालवधी लागत होता. आता फक्त ५ दिवसांत याचा लाभ मिळणार आहे.

पीएम ई-ड्राइव्ह योजना म्हणजे काय?
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ सप्टेंबर २०२४ रोजी ही योजना सुरू करण्यास मान्यता दिली होती. तर १ ऑक्टोबर २०२४ पासून ही योजना लागू झाली असून ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहील. १०,९०० कोटी रुपयांच्या बजेटची ही योजना प्रामुख्याने इलेक्ट्रिक दुचाकी, तीन चाकी वाहने, बस, ट्रक आणि रुग्णवाहिका यांसारख्या वाहनांना अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. २४.७९ लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि ३.१६ लाख ३ चाकी वाहनांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे.

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदान
पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत, इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीदारांना पहिल्या वर्षी १०,००० रुपये आणि दुसऱ्या वर्षी ५,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये ओला, एथर, टीव्हीएस आणि बजाज चेतक सारखे लोकप्रिय ब्रँड या योजनेअंतर्गत येतात.

पीएम ई-ड्राइव्ह योजनेचा लाभ कसा घ्यायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, प्रथम पीएम ई-ड्राइव्ह पोर्टलवर जा आणि ई-व्हाउचरसाठी अर्ज करा. आता पात्र ईव्ही खरेदी करा आणि ई-व्हाउचरवर सही करा. यासोबतच, डीलरसोबत पोर्टलवर ई-व्हाउचर अपलोड करा. ह्या सर्व गोष्टी अवघड वाटत असतील तर तुमची दुचाकी डीलरही या गोष्टी करुन घेतो. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही

Raj Sharma is a dedicated writer at Agnihotri Group, specializing in Sarkari Yojana updates and government schemes. With a deep understanding of public welfare programs, he aims to simplify complex policy details for the common man. His articles help readers stay informed and take advantage of the benefits provided by various government initiatives.

Leave a Comment