PF new rules राज्यातील पीएफ धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आज आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत की राज्यातील पीएफ धारकांना पाच लाख रुपये कसे मिळणार आहेत कोणाला मिळण्यात यासाठी त्यांना काय करावे लागेल बघूया संपूर्ण माहिती.
PF new rules पूर्ण माहिती
देशभरातील पीएफ धारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्या आपण पैशांची बचत करत असतो तर कोणी सेविंग खात्यामध्ये करत असतात तर कोणी आपल्या बँकेच्या एफडी योजनेमध्ये पैसे तुम्ही कुठलीही नोकरी करत असताना पीएफ जर तुमच्याकडे असेल तर पीएफ धारकांना एक पाच लाख रुपये मिळू शकतात पीएफ फंडामधील काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत या बदलाविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे बघूया संपूर्ण माहिती
PF account rules कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील 7.5 कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता पीएफ काढण्यासाठी ऑटो सेटलमेंट मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ही मर्यादा आतापर्यंत 1 लाख रुपये होती. म्हणजेच आता पीएफ खातेदार कोणत्याही कागदपत्रांशिवाय इतकी रक्कम काढू शकणार आहेत.
यासोबतच 10 दिवस लागणाऱ्या क्लेम सेटलमेंट आता फक्त 3-4 दिवसात पूर्ण होणार आहे. याशिवाय, EPFO ने लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठी पीएफ ऑटो-क्लेम सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, पीएफ खात्यातून केवळ आजार आणि रुग्णाच्या खर्चासाठी ऑटो-क्लेम उपलब्ध होता.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमध्ये झालेल्या सीबीटीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.याशिवाय, या बैठकीत असे सांगण्यात आले की, EPFO सदस्य आता या वर्षी मे किंवा जूनच्या अखेरीस UPI (UPI PF Withdraw) आणि ATM (ATM PF Withdrawl) द्वारे PF काढू शकतात.
EPFO ने एप्रिल 2020 मध्ये सदस्यांना ऑटो-क्लेम सुविधा देण्यास सुरुवात केली. ही सुविधा सुरुवातीला फक्त 50,000 रुपयांपर्यंत मर्यादित होती. यानंतर, मे 2024 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ ऑटो क्लेमची मर्यादा वाढवून ती 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये केली. त्यात आता मोठा दिलासा मिळाला असून ही मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
दावा नाकारण्याचे प्रमाण कमी झाले
बैठकीत माहिती देताना असे सांगण्यात आले की पीएफ क्लेम रिजेक्शन रेटमध्ये सातत्याने घट होत आहे आणि पूर्वी जवळपास 50 टक्के दावे फेटाळले जायचे, आता त्यांची संख्या केवळ 30 टक्क्यांवर आली आहे.
ATM तसेच UPI द्वारे PF पैसे काढण्याची सुविधा
अलीकडेच सचिव डावरा यांनी माहिती दिली होती की लवकरच EPFO सदस्यांना ATM तसेच UPI द्वारे PFचे पैसे काढण्याची सुविधा मिळू शकेल. या सुविधेमुळे, ते फक्त UPI वर त्यांची PF शिल्लक थेट तपासू शकणार नाहीत, तर ठराविक रकमेपर्यंत पैसे काढू शकतील, यासोबतच त्यांना त्यांच्या आवडत्या बँकेत PFचे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधाही मिळणार आहे.