Mofat Sadi ladaki bahin या लाडक्या बहिणींना मोफत साडी मिळणार
Mofat Sadi ladaki bahin राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येताय लाडक्या बहिणींना आता मोफत साडी मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यात साड्या वाटप होणारे सरकारने काय सांगितले याविषयी आपण माहिती बघणार आहोत राज्यातील लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे आनंदाची बातमी आहे
Mofat Sadi ladaki bahin संपूर्ण माहिती
राज्य सरकार केंद्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच काय ना काही योजना लागू करत असते यामध्ये केंद्र सरकारच्या योजना आहेत त्याचप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्री लार्की बहिणी योजना माजी कन्या श्री भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना यामुळे महिलांच्या विकासासाठी त्यांना मदत होत असते आता यातच लागू करता आता लाडक्या बहिणींना मोफत साडी मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे आणि नेमकी ती योजना कोणती आहे याविषयी आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत
Mofat Sadi ladaki bahin राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती. मात्र, होळी आणि गुढीपाडवा सण होऊन एक महिना उलटून गेला तरीही दिंडोरी व पेठ तालुक्यांतील लाभार्थींच्या हाती अद्याप साड्या पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे ही योजना अक्षय तृतीयेला प्रत्यक्षात उतरणार आहे.
राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांमार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साड्या वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तयारी केली होती. दिंडोरी तालुक्यात १३ हजार १२७लाभार्थिनींसाठी साड्या ८ एप्रिल रोजी तालुका गुदामात दाखल झाल्या.
त्यापैकी १४ एप्रिलपर्यंत १७३ स्वस्त धान्य दुकानांपैकी ७३ दुकानांमध्ये ६ हजार ९५ साड्या वितरित करण्यात आल्या असून, उर्वरित १०० दुकानांमध्ये साड्या पोचवण्याचे काम सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांनी दिली.
पेठ तालुक्यातील १० हजार ७८२ लाभार्थिनींसाठी ९ एप्रिल रोजी साड्यांचा साठा मिळाला आहे.सध्या स्वस्त धान्य दुकानांपर्यंत साड्या पोचवण्याचे काम सुरु असून लवकरच लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे वाटप होईल, असे प्रशासनाने सांगितले.दरम्यान, होळी सणासाठी जाहीर केलेली साडी वाटप योजना प्रत्यक्षात महिनाभर उशिराने राबवली जात असल्याने लाडक्या बहिणींना होळीऐवजी अक्षयतृतीयेला ही साडी मिळणार आहे.
वणी येथे अंत्योदय योजनेचे ६६९ लाभार्थी आहे. त्यापैकी ६५० साड्या प्राप्त झाल्या आहेत. त्या लाभार्थींना २१ तारखेपासून धान्याबरोबरच वितरित करण्यात येणार आहे.
– दीपक गायकवाड, संचालक, स्वस्त धान्य दुकान, वणी
शासनाने होळी उत्सवाची भेट म्हणून मोफत साडी देणार असल्याचे जाहीर केले होते. आम्ही रेशन दुकानदाराकडे साडी आली का नाही याबाबत चौकशी करण्यासाठी वेळोवेळी चकरा मारल्या. आता महिना झाला तरी, भावाची लाडक्या बहिणीला साडी मिळेना.
साड्या पुरवठादार एजन्सीकडून ८ एप्रिल रोजी तालुक्यातील अंत्योदय शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी प्राप्त झाल्या आहेत. त्या स्वस्त धान्य दुकानांना पोच करण्यात येत आहेत. लाभार्थ्यांना साड्या लवकरात लवकर वितरित करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकान संचालकांना केल्या आहेत.