Maharastra Weather News राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे हवामान खात्यात दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे नेमका कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात
Maharastra Weather News पूर्ण माहिती
राज्यातील देशभरातील नागरिकांसाठी आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकऱ्याचे सर्वस्वी जीवन हे पावसावर अवलंबून असते आत्ताच पाण्यावर अवलंबून असते. आता तुम्हाला माहिती आहे का आता उन्हाळा चालू आहे परंतु अवकाळी पाऊस देखील आताच पडण्यास सुरुवात झालेली आहे नेमके हवामान खात्याने काय सांगितले कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार आहे आणि कुठे पडणार आहे कोणत्या दिवशी याबद्दल आपणास माहिती पाहूयात
Maharastra weather today मुंबईत कमाल तापमान 34अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. शहरात दुपारी उष्णता आणि आर्द्रता जाणवेल, परंतु संध्याकाळी ढगाळ वातावरणामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, पण पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.
पुण्यात कमाल तापमान 38 अंश आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सांगलीत दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा येथे तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तर संध्याकाळी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी येथे तापमान 39 अंश सेल्सिअस राहील, तर जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता आहे.हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा देत नागरिकांना दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसे पाणी प्यावे आणि हलके कपडे परिधान करावेत, असे आवाहन आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सावध राहण्यास सांगितले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे.