LIC vimas schemes राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी महिलांना आता 7000 रुपये मिळणार आहे त्यामुळे ते सात हजार रुपये त्यांना कसे मिळतील कोणामुळे मिळतील कसा अर्ज करावा लागेल यासाठी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत महिलांचे आर्थिक अडचण दूर करण्यासाठी हे पैसे मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती
LIC vima schemes संपूर्ण माहिती
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार केंद्र सरकार आता वेगवेगळे योजना राबवत आहे याच्यामध्ये आता महिलांना जवळपास या योजनेअंतर्गत महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत ती योजनाही एलआयसी विमा साठी योजना याच्यात तुम्ही अर्ज केला आणि तुम्ही जर पात्र ठरला तर तुम्हाला जवळपास काम करता करता पार्ट टाइम महिन्याला स्वतःचा व्यवसाय मिळतील चांगला तुमच्या परफॉर्मन्स झाला तर तुमची ते पैसे पण वाढतील तर बघूया त्यासाठी आपल्याला काय करायचं
विमा सखी नेमकं काय करणार?
या योजनेअंतर्गत विमा एजंट बनून महिला लोकांमध्ये सर्वांसाठी विमा अभियान पसरवून कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करतील. विमा सखी योजनेचा भाग बनून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची आणि स्थिर करिअर घडवण्याची संधी मिळेल. याद्वारे, महिला अतिरिक्त उत्पन्न मिळवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील.
या योजनेअंतर्गत महिलांना LIC एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाईल तर, या काळात दरमहा ७ हजार ते ५ हजार रुपये देखील दिले जातील. याशिवाय पॉलिसी खरेदी केल्यावर कमिशन देखील मिळेल. या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी दरमहा ७,००० रुपये, दुसऱ्या वर्षी ६,००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५,००० रुपये दरमहा वेतन मिळेल. अशाप्रकारे, तीन वर्षांत एकूण २,१६,००० रुपये दिले जातील. लक्षात घ्या की या योजनेत तुम्हाला दरवर्षी काही विशिष्ट उद्दिष्टे साध्य केल्यांनतर स्टायपंड दिले जाईल.
योजनेच्या पात्रता आणि अटी काय?
विमा सखी होण्यासाठी तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. तसेच महिलांनी दहावी उत्तीर्ण केले पाहिजे. अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या LIC शाखेला भेट देऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. या योजनेत अर्ज करण्यासाठी अनेक कागदपत्रे आवश्यक आहेत. यामध्ये दोन नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्व-साक्षांकित प्रत जोडावी लागेल. तसेच, बँक खात्याचा तपशील सादर करावा लागेल.
मासिक वेतन मिळवण्यासाठी कोणती लक्ष्ये गाठावी लागतील?
पहिल्या वर्षी तुम्हाला २४ लोकांचा विमा काढावा लागेल आणि पहिल्या वर्षी किमान ४८,००० रुपये कमिशन (बोनस कमिशन वगळून) मिळवावे लागेल. पहिल्या वर्षी तुम्हाला दरमहा ७,००० रुपये स्टायपेंड मिळेल.
दुसऱ्या वर्षी स्टायपेंड ६,००० रुपये असेल पण, यासाठी पहिल्या वर्षी घेतलेल्या किमान ६५% पॉलिसी दुसऱ्या वर्षाच्या शेवटपर्यंत लागू राहणे आवश्यक आहे.
तिसऱ्या वर्षी तुम्हाला ५,००० रुपये स्टायपेंड मिळेल, ज्यासाठी दुसऱ्या वर्षी घेतलेल्या किमान ६५% पॉलिसी तिसऱ्या वर्षाच्या अखेरीपर्यंत सक्रिय राहणे आवश्यक आहे.