Kisan farmer ID राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता सरकार नेहमीच काही ना काही नवीन नवीन योजना आणत असतात त्यामध्ये आता या योजनेचा लाभ जर त्यांना घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना एक कार्ड काढावे लागेल हे कार्ड कसे काढायचे आणि ह्या कार्डचा उपयोग काय होणार आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत
Kisan farmer ID संपूर्ण माहिती
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार राज्य सरकार नेहमीच काय ना काही मदत करत असते पिक विमा अनुदान त्यानंतर किसान नमो शेतकरीच योजनेचा हप्ता तर या सर्व योजनेचे जे काय हप्ते असतात ते मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्वतःची ओळख दाखवण्यासाठी एक कार्ड काढावे लागेल त्या कार्डाचे नाव आहे फार्मर आयडी कार्ड त्याचप्रमाणे इतर काही पिक विमा अनुदान हे सर्व शेतकऱ्यांना जे लाभ मिळत असतात आता याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे जर तुम्ही हे कार्ड काढलं नाही तर तुम्हाला जवळपास या सर्व सुविधांचा लाभ मिळणार नाही या कार्डचे नाव आहे किसान फार्मर आयडी कार्ड हे तुम्हाला प्रत्येकाला काढणं गरजेचं आहे जर फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला वरील सुविधांचा लाभ मिळणार नाहीये आजच्या डिजिटल युगामध्ये सर्वत्र ऑनलाईन व्यवहार चालू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा डेटा देखील आता ऑनलाईन माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला हे कार्ड काढावा लागेल तर बघा काढण्यासाठी काय प्रोसिजर लागते पूर्ण माहिती
Kisan farmer ID कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य सरकारने याबाबचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन आदेश शुक्रवारी 11 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना तातडीने संबंधि वेबसाइटवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, लवकरात लवकर ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने देता यावा, यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह 24 राज्यांमध्ये ‘ॲग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. परंतु अजूनही अनेक खेड्यापाड्यात या प्रकल्पाविषयीची माहिती व्यवस्थित पोहोचलेली नाही.