HSC result tarikh राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येताय बारावीचा निकाल कधी लागणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे मे महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्या विद्यार्थी पालकांचे दाखल सुरू झालेले आहे आता त्यामध्ये निकाल कधी लागणार आहे बघूयात संपूर्ण माहिती
HSC result tarikh संपूर्ण माहिती
यावर्षी सरासरी दर वर्षाप्रमाणे दहावी बारावी परीक्षेच्या ज्या आहेत लवकर घेण्यात आले त्याच एकमेव कारण म्हणजे परीक्षा लवकर घेतल्या तर त्याचं लवकर निकाल लावता येईल आणि लवकर निकाल लागला तर मुलांच्या प्रवेश प्रक्रिया लवकर होतील त्यामुळे त्यांचा शैक्षणिक नुकसान होणार नाही आपल्या आयुष्यातील भरपूर महत्त्वाचा असतो कारण याच निकालाच्या आधारावर आपल्याला पुढची प्रवेश प्रक्रिया असते आणि त्यामुळे निकाल हा भरपूर महत्त्वाचा मानला जातो निकाल लागल्यानंतर आपल्याला पुढे प्रवेश प्रक्रिया देखील सुरळीत पार पडते यावर्षी निकाल साधारणता लवकर लागणार आहेत कारण परीक्षा देखील लवकर झालेली आहे संपूर्ण अपडेट
SSC HSC result tarikh राज्यातील सर्वच शिक्षकांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण केल्या आहेत. आता निकाल छपाई सुरू झाली असून १३ मे रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्याची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्री करतील, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
यंदा पहिल्यांदाच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर सुरू झाली होती. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च य काळात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात बोर्डाने घेतली. परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. आता उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिला आहे का?, उत्तरपत्रिकेवरील गुण आणि गुणपत्रिकेवर घेतलेले गुण बरोबर आहेत का?, याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे.
चालू आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बोर्डाचा निकाल ११ मेपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर १३ किंवा १४ मे रोजी बारावीचा तर दहावीचा निकाल १६ मेपूर्वी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार असून त्यासंदर्भातील वेबसाइट पुढील आठवड्यात बोर्डाकडून दिल्या जाणार आहेत. निकालानंतर त्यांना पुढील प्रवेशाचे अचूक नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
शिक्षणमंत्री करतील लवकरच घोषणा
इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून सध्या गुणांची अंतिम पडताळणी सुरू आहे. आठ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. बारावीचा निकाल यंदा प्रथमच १३ किंवा १४ मे आणि दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल. त्याची घोषणा शिक्षणमंत्री लवकरच करतील.