Free Electricity Yojana या नागरिकांना मोफत वीज मिळणार सरकारचा मोठा निर्णय

Free Electricity Yojana राज्यातील नागरिकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे आता राज्यातील नागरिकांना मोफत वीज मिळणार आहे कोणत्या नागरिकांना मोफत वीज मिळणार कशामुळे मिळणार बघूयात संपूर्ण माहिती

Free Electricity Yojana पूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्त्वाची निर्णय शासनाने घेतला मोठा निर्णय आता मिळणार तुम्हाला वीज मोफत विजेचा किती महत्त्व तुम्हाला माहीत असेल कारण प्रत्येक महिन्याला बिल भरून जर तुम्ही थकला असताल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्रचे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की आता तुम्हाला वीज बिल माफ होणार आहे नेमका कुणाला विज बिल माफ होणार कशामुळे होणार कोणत्या शहरात होणार याचे पूर्ण माहिती आपण संपूर्ण विश्लेषित पाहूया

राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ पर्यंत वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल, तसेच येत्या पाच वर्षांत राज्यातील सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होईल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १३) केले. विदर्भात उद्योग उभारणीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह ७२० कोटींच्या विकासकामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले,‘‘राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती. यादृष्टीने शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, डिसेंबर २०२६ पर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाला

१२ तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल.
राज्य शासनाने २०२५ ते २०३० पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे बिल दरवर्षी कमी करण्याचे नियोजन केले आहे. तसेच ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल.’’ शेतकरी, शेतमजुरांवरील वन्यप्राण्यांचे हल्ले थांबविण्यासाठी शासन ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित व्यवस्थापन प्रणाली विकसित करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे यांच्यासह स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

दहा जिल्हे होणार सुजलाम्‌ सुफलाम्‌
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यांमधील काही दुष्काळग्रस्त भाग सुजलाम्‌ सुफलाम्‌ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द धरणातील ६२ टीएमसी पाणी सांडव्याद्वारे वळविण्यासाठी ५५० किलोमीटर लांबीची नदीच तयार करण्यात येणार आहे. यासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी सर्व मंजुऱ्या देण्यात आल्या असून योजनेचा अंतिम आराखडा तयार होत आहे. यावर्षाअखेरी किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीला या योजनेचे काम सुरू होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

विदर्भात मोठी गुंतवणूक
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी १६.५ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून यातील सात लाख कोटींचे करार विदर्भासाठी करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. वर्ध्यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणार आहे. येत्या काळात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये लोह खनिजावर आधारित उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने विशेष सवलत दिली असून या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे प्रस्ताव शासनाकडे आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Raj Sharma is a dedicated writer at Agnihotri Group, specializing in Sarkari Yojana updates and government schemes. With a deep understanding of public welfare programs, he aims to simplify complex policy details for the common man. His articles help readers stay informed and take advantage of the benefits provided by various government initiatives.

Leave a Comment