CNG price today राज्यातील धारकांना मोठा धक्का बसलेला आहे कारण आता CNG गॅस किमतीमध्ये वाढ झालेली आहे नेमके कोणत्या गॅस कोणत्या सीएनजी गॅस मध्ये वाढलेली जागा झालेली आहे किती प्रकारची वाढ झालेली याची माहिती आपण बघणार आहोत
CNG price today पूर्ण माहिती
गॅस सीएनजी चा उपयोग आजच्या युगामध्ये भरपूर होतो कारण याच्यामध्ये आपल्याला भरपूर चांगला प्रतिसाद मिळतो आणि चांगले आपल्याला गाडी चालवण्यास मदत होते कमी खर्च लागतो गॅस देखील आता माग होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना भरपूर फटका बसणार आहेत नेमकं किती मागवणार आहे आणि किती प्राइस असणार आहे कोणत्या जिल्ह्यात याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत
CNG price today सीएनजी आणि पीएनजी लवकरच महाग होऊ शकतात. त्याच कारण म्हणजे भारत सरकारने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL), महानगर गॅस लिमिटेड (MGL) आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड सारख्या शहरी गॅस वितरण कंपन्यांना कमी किमतीच्या APM गॅसचा पुरवठा 20 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता
महत्त्वाचे म्हणजे याचा कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. एपीएम गॅसची किंमत सध्या प्रति एमएमबीटीयू 6.75 डॉलर आहे. तर नवीन विहिरींमधून मिळणारा गॅस सुमारे 8 डॉलर प्रति एमएमबीटीयू आहे.
सीएनजी आणि पीएनजीच्या किरकोळ किमती वाढू शकतात
गॅस पुरवठ्यासाठी नोडल एजन्सी असलेल्या गेल इंडिया लिमिटेडने 16 एप्रिलपासून गॅस वाटपात कपात केल्याची माहिती दिली आहे. आयजीएल, एमजीएल आणि अदानी टोटल गॅसने शेअर बाजाराला सांगितले की त्यांना 125 टक्क्यांपर्यंत जास्त किमतीत गॅस वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्यांचा इनपुट खर्च तर वाढेलच पण सीएनजी आणि पीएनजीच्या किरकोळ किमतीतही वाढ होऊ शकते.
गेल्या एका वर्षात शहरी गॅस वितरण कंपन्यांना होणाऱ्या एपीएम गॅसच्या पुरवठ्यात जवळपास 50 टक्क्यांनी घट झाली आहे. पूर्वी, एपीएम गॅस एकूण गरजेच्या 51 टक्के भागवत असे, जे आता 34 टक्के पर्यंत कमी झाले आहे. याचा थेट परिणाम शहरी ग्राहकांना उपलब्ध असलेल्या सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींवर होऊ शकतो.
2022 मध्ये जाहीर झालेल्या गॅस पुरवठा धोरणानुसार, एपीएम गॅसचा प्राथमिक वापर शहरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस (पीएनजी) आणि वाहन इंधन (सीएनजी) म्हणून करायचा होता, परंतु, आता या प्राथमिक क्षेत्रांनाही महागडा गॅस मिळण्याची शक्यता आहे.