Aadhar card rules राज्यातील आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आधार कार्ड वरील नियम बदलले आहेत नेमके कोणते नियम बदललेले आहेत त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे आपल्याला आधार कार्ड अपडेट करावे लागणार की नाही याबद्दल आपण आता सविस्तर माहिती पाहूयात
Aadhar card rules पूर्ण माहिती
आधार कार्ड हा आपला सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो आधार कार्ड म्हणजेच आपल्याला आधार दिला जातो आपल्या राष्ट्रीय तत्वाची ओळख करून देणारा पुरावा म्हणजेच आधार कार्ड आपण इतर शासकीय सुविधांचा देखील आधार कार्डवर वापर करून उपयोग करून घेतो आपल्याला प्रत्येक ठिकाणी शासनाच्या असतील बँकेच्या असतील आर्थिक व्यवहार असतील कुठले रेल्वे तिकीट असेल कुठेही तुम्हाला आधार कार्डचा उपयोग होतो आधार कार्ड संबंधित असा काही नियम बदलले त्याबद्दल माहिती बघूया
Aadhar card update याआधी तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये जायचे असेल किंवा कॉलेज किंवा अन्य ठिकाणी ओळख द्यायची असेल तर आधार कार्डची हार्ट किंवा सॉफ्ट कॉपी मागितली जायची. यापुढे मात्र असे होणार नाही. कारण UIDAI ने आधार कार्ड स्मार्ट फेस ऑथेंटिफिकेशन फीचर अॅड केलं आहे. या फिचरच्या मदतीने चेहऱ्याला स्कॅन करून आधार कार्डची ओळख पटणार (आधार कार्डचे सत्यापण) आहे.
आधार कार्डची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी लागणार नाही
माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत फेस आयडी ऑथेंटिफिकेशनबाबात माहिती दिली आहे. फेस आयडी ऑथेंटिफिकेशनसाठी आता आधार कार्डची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी लागणार नाही. ज्या पद्धतीन यूपीआयच्या मदतीने आर्थिक व्यवहार केले जातात. त्याच पद्धतीने आधारची पडताळणी करू शकता. त्यासाठी फक्त तुमच्याकडे स्मार्टफोन असणे गरजेचे आहे.
वैयक्तिक माहिती राहणार सुरक्षित
UIDAI च्या स्मार्ट ऑथेंटिफिकेशन फीचरमुळे तुमच्या वैयक्तिक आणि खासगी माहितीला कोणताही धोका नसेल. ही माहिती सुरक्षित असेल. आधार कार्डच्या ऑथेंटिकेशनसाठी आता तुम्हाला आधार कार्डची सॉफ्ट किंवा हार्ड कॉपी जवळ असणे गरजेचे नाही. फक्त स्मार्ट फोनच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा स्कॅन करून आधारची पडताळणी करू शकता.
फेस ऑथेंटिफिकेशन कसे होणार?
आधार कार्डचे फेस ऑथेंटिफिकेशन फिचर वापरायचे असेल तर तुमच्याकडे फक्त एक स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला NEW Aadhaar App इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर अॅपमध्ये ज्या स्टेप्स फॉलो करायला सांगितल्या आहेत, त्या कराव्यात. या सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आधारची पडताळणी (सत्यापण) करू शकता. सध्यातरी आधार कार्ड फेस ऑथेंटिफिकेशन फिचर हे बिटा टेस्टिंग व्हर्जनमध्ये आहे. त्यामुळे हे फिचर वापरण्यासाठी सामान्यांना थोडी वाट पाहावी लागेल.