Maharastra Government Jobs राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्हाला नोकरी मिळणार आहे सरकारी बारावी पास वर ही नोकरी निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील अर्ज ऑनलाईन करायचे किंवा ऑफलाइन बघूयात पूर्ण माहिती
Maharastra Government Jobs संपूर्ण माहिती
प्रत्येक तरुण हा शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या नोकरीच्या शोधत असतो कारण आपल्याला एक चांगली नोकरी मिळाली तर त्याला एक चांगले जीवन जगता येत त्या नोकरीच्या आधारावर त्याचा आर्थिक सक्षमता वाढत असते आणि तो चांगल्या प्रगतीपथावर असतो परंतु आज नोकऱ्या कमी आणि बेरोजगार तरुण जास्त झालेले आहेत यात सदा तुम्ही जर बेरोजगार असतात किंवा बारावी पास असतात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समरीत आहे पर्यावरणात विभागामध्ये बारावी पास व समक्ष शिक्षणावर आधारित नोकरी निघालेली आहे या नोकरीमध्ये तुम्हाला किती पगार असणार त्याचप्रमाणे आपल्याला कसा अर्ज करायचा किती पद आहेत आणि कोठे ही जागा निघालेल्या आहेत याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.
सरकारी नोकरी बारावी पास वर
Maharastra government jobs बेरोजगारी हा ज्वलंत प्रश्न असल्याने युवक वणवण भटकत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. त्यातही सरकारी नौकरीची जाहिरात निघाली की त्यावर उड्याच पडतात. पण तशी संधी व अपेक्षित पात्रता जुळून येत नसल्याचा अनुभव शेकडो बेरोजगार घेत असतात. ही संधी सरकारी, कमी पात्रतेची व पुरेसा पगार देणारी ठरावी.
नागपूरची ही प्रख्यात संस्था आहे. येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात नीरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेत पदभरती होत आहे. त्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. कनिष्ठ सचिवालाय सहाय्यक व कनिष्ठ स्टेनोग्राफर अशी पदे आहेत. त्यासाठी बारावी उत्तीर्ण ही पात्रता ठेवण्यात आली आहे.
सरकारी नोकरीची ही उत्तम संधी समजल्या जाते. ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट व ज्युनिअर स्टेनोग्राफर या पदांची ही भरती आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १ एप्रिल पासून सूरू झाली आहे. त्याची माहिती संस्थेच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. ३० एप्रिल २०२५ पर्यंत आवेदन अर्ज सादर करता येणार आहे. या जागा तीन वेगवेगळ्या विभागात भरल्या जाणार आहेत. या दोन्ही पदांसाठी अर्ज इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण केली असावी.
बारावी पास वर पगार 60हजार
या शिवाय संगणकावर टायपिंगची गती चांगली असणे महत्वाचे ठरेल. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व संगणक टायपिंग स्पीड टेस्ट या आधारे केल्या जाणार आहे. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक सहाय्यक पदासाठी उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल वय मर्यादा २८ वर्ष आहे. तर कनिष्ठ स्टेनोग्राफर पदासाठी १८ ते २७ अशी ठेवण्यात आली आहे.
या सरकारी नोकरीसाठी लेखी परीक्षा ओएमआर आधारित राहणार. या पद्धतीत २०० प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी अडीच तासांचा आहे.
पेपर एक हा मानसिक क्षमता चाचणीचा असणार. तर पेपर दोन हा सामान्य ज्ञान व इंग्रजी भाषेचा राहील. ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट पदासाठी १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये अशी वेतनश्रेणी लागू राहील आणि ज्युनिअर स्टेनोग्राफर या पदासाठी २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये ही वेतनश्रेणी मिळणार. या पद भरती अनुषंगाने इतर सर्व तपशील सीएसआयआर निरीच्या अधिकृत वेबसाईटवर तपासता येईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावी पास वर आपल्याला सरकारी नोकरी कोणत्या विभागात मिळणार आहे याची माहिती आपण पाहिली आहे.