RTE ADDMISSION updates महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे हे धक्कादायक बातमी कुठली आहे आणि विद्यार्थी पालकांना का महत्वाचे आहे याबाबत आपणास माहिती पाहणार आहोत
RTE ADDMISSION updates पूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी शिक्षण क्षेत्रातून एक मोठी अनेक धक्कादायक बातमी समोर येत आहे तुमच्या मुलाने शाळेत प्रवेश घेतला असेल इंग्लिश मीडियम चे शाळेमध्ये आपल्याला माहिती आहे की RTE अंतर्गत जर तुमच्या मुलाने प्रवेश घेतला असेल तर तुमच्या मुलाला इंग्लिश मीडियम मध्ये काही जागा ज्या शिल्लक असतात त्या आपल्याला गरिबांच्या मुलाला RTE अंतर्गत प्रवेश मिळतात यामध्ये काही मोठी धकाधक बातमी समोर येत आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांना ही गोष्ट माहित असणं गरजेचं आहे नेमकी कोणती धक्कादाय बातमी बघूया संपूर्ण माहिती
RTE ADDMISSION updates प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सुमारे 452 शाळांना शुल्क प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाळांना काही कागदपत्र सादर करण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. या कागदपत्रांची त्रुटी पूर्ण केल्यानंतर संबंधित शाळा पात्र होतील. मात्र, त्रुटीपूर्तता न केलेल्या शाळा अपात्र ठरणार असल्याने संबंधित शाळांच्या शुल्क प्रतिपूर्तीचा विषय निर्माण होऊ शकतो. या शाळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करू शकतात.
पुणे जिल्ह्यातील त्रुटी असलेल्या या 452शाळांना प्रामुख्याने वर्गमान्यता आदेश, जागा कागदपत्रे, शाळेचा पत्ता यामध्ये तफावत, फी देय वर्षातील नमुना नं 2 जोडलेला नाही अशा विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. आता दिलेल्या वेळेत जर या शाळांनी या त्रुटी पूर्ण केल्या तर त्यांना पात्र ठरवण्यात येईल.
सध्या आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत सर्वसाधारण यादी त्यानंतर पहिल्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश निश्चित करण्यात आले. त्यानंतर आता प्रवेशाच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दि. ८ एप्रिल १५ एप्रिल ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार असून आतापर्यंत दुसऱ्या प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या ९ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी ५५४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अद्याप ९ हजार १७२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांनी काही कागदपत्र अपलोड करणे गरजेचे असते. त्यामध्ये स्वमान्यता प्रमाणपत्र, प्रथम मान्यता प्रमाणपत्र या कागदपत्रांसह विद्यार्थ्यांकडून घेतलेली ऑनलाईन फी आदी गोष्टींचा समावेश आहे. या त्रुटी ज्या शाळांच्या दिसून येत आहेत त्यांना त्रुटी पूर्ततेसाठी मुदत दिलेली आहे. संबंधित शाळांनी त्रुटीची पूर्तता करावी. त्यानंतर या शाळा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र होतील. – संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद, पुणे