Pik Vima Anudas राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत नेमके कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत
Pik Vima Anudas पूर्ण माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकरी हा पूर्णतः पावसावर अवलंबून असतो पावसावर शेती त्याची अवलंबून असते आणि पावसाचा हवामानाची जर साथ त्याला मिळाले नाही तर त्याच्या शेतीवर भरपूर फरक पडत असतो यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार त्यांना वेगवेगळ्या योजना राबवत असतात अनुदान देत असतात आता पीक विमा देखील राज्यातील शेतकरी त्याची प्रतिक्षा पाहत होते तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा मंजूर झालेला आहे त्यांच्या खात्यावर देखील आता पैसे वाटप करण्यात आलेले आहेत नेमकी याविषयी आपण माहिती बघूयात
Pik vima anudans जिल्ह्यानिहाय पीकविमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजुर झाली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ४२६ कोटी विमा भरपाई मंजूर आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण १ हजार ७६० कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्याला सुरुवात झाली. तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये भरपाई मिळेल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात पीकविम्याची भरपाई मंजूर झाली आहे. मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली ? तसेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर आहे? याची माहिती पुढीलप्रमाणे
देड
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – १०२ कोटी ६२ लाख
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती – २४५ कोटी ५९ लाख
एकूण भरपाई – ३५७ कोटी २१ लाख
हिंगोली
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – २६ कोटी ६८ लाख
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती – १५४ कोटी ३६ लाख
एकूण भरपाई – १८१ कोटी ५ लाख
बीड
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – २१२ कोटी ७६ लाख
धाराशिव
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – २३१ कोटी ५ लाख
छत्रपती संभाजीनगर
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – ८३ कोटी ३८ लाख
पीक कापणी प्रयोग भरपाई – ४कोटी ८३ लाख
एकूण भरपाई – ८८ कोटी २१ लाख
जालना
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – १९६ कोटी ९५ लाख
काढणी पश्चात भरपाई – ६६ कोटी ४४ लाख
एकूण भरपाई – २६३ कोटी ४० लाख
परभणी
स्थानिक नैसर्गिक आपत्ती – १०१ कोटी ८९ लाख
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती – २९६ कोटी ८८ लाख
काढणी पश्चात भरपाई – २७ कोटी ७७ लाख
एकूण भरपाई – ४२६ कोटी ५५ लाख